गुजरात : भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा सण जानेवारी महिन्यात अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. तसेच मकरसंक्रांतीनिमित्त गुजरातमध्ये इंटरनॅशन पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या इंटरनॅशन पतंग महोत्सवाचे शनिवारी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी उद्घाटन केले.
या महोत्सावात ४७ देशातून १४३ स्पर्धक सहभागी झाले आहेत. हा महोत्सवा चार दिवस चालणार आहे. अहमदाबादच्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर हा महोत्सव ११ ते १४ जानेवारीदरम्यान चालणार आहे. अहमदाबादबरोबर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या समोर एकता नगर, राजकोट, वडोदरा, सुरत, शिवराजपूर, याठिकाणीही एक – एक दिवस हा महोत्सव भरवला जाणार आहे. यावेळी बोलताना गुजराजचे मुख्यमंत्री पटेल म्हणाले की देशाच्या पंतग मार्केटमध्ये मार्केटमध्ये ६५ टक्के वाटा एकट्या गुजरातचा आहे. गुजरातमधून ब्रिटन, कॅनडा, अमेरिका आदी देशात पतंग निर्यात केले जातात.
राजकोट महापालिका आयुक्त तुषार सुमेरा म्हणाले की आज यथे भरलेल्या पतंग महोत्सवात देशविदेशातून स्पर्धक व पर्यटक सहभागी झाले आहेत. गजरातचे पर्यटनमंत्री मुलू बेरा यांनी सांगितले की या महोत्सवात १४३ विदेशी पतंगबाज व देशातंर्गत ५२ पतंगबाज जे विविध ११ राज्यातून सहभागी होणार आहेत.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…