कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा डंपरने बुधवारी निशा सोमेशकर (३९) आणि निशाचा मुलगा अंश सोमेशकर (३.५) या दोघांना चिरडले होते. या अपघातात निशा आणि अंशचा मृत्यू झाला होता. अपघात प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि दोषीवर कारवाई व्हावी या मागणीसाठी मनसेच्या नेतृत्वात स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. आता या प्रकरणात आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. वैभव वायराड असे वाहन चालकाचे नाव आहे.
मुंबईत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ ताशी ८० किमी वेगाने धावणार
अंश कल्याणमधील एका शाळेत नर्सरीत शिकत होता. आई अंशला घेऊन घरी जात होती, त्यावेळी डंपरने दोघांना चिरडले होते. या अपघातात निशा आणि अंश गंभीर जखमी झाले. या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. कल्याणमधील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ अपघात झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. न्यायालयाने कल्याण अपघात प्रकरणी दोषीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.