चिंतामणी कलामंच विश्वस्त संस्था, मुंबई आयोजित ‘महासंग्राम – खासदार करंडक २०२४’
मुंबई : मराठी रंगभूमीचे विस्तृत साम्राज्य जोपासणे ही सर्व रंगकर्मींची जबाबदारी आहे. या साम्राज्यात व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना प्राधान्य दिले जात असले तरी एकांकिका ही प्रथम पायरी असते. या विश्वात नाट्यकर्मींना संधी देण्यासाठी नवनवीन एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जातात. गेले ५ वर्षे अशीच एक स्पर्धा लोकप्रिय होत आहे. चिंतामणी कलामंच विश्वस्त संस्था, मुंबई आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘महासंग्राम – खासदार करंडक २०२४’.
चिंतामणी कलामंच २०१८ साली ‘प्रथमेश पिंगळे’ यांनी सुरू केली.
प्रथमेश पिंगळे हे एक उत्कृष्ट संकलक असून त्यांना नाटकांची प्रचंड आवड आहे. रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रत्येक मुलांमधील गुण जगासमोर यावेत, त्यांना जास्तीत जास्त वाव मिळावा हीच इच्छा बाळगून जास्तीत जास्त संस्थांना लाईट शो करण्यासाठी प्राधान्य देणारी मुंबईतील ही एकमेव संस्था आहे. अनेक नाट्यसंस्था एकांकिका स्पर्धांमार्फत कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध पारितोषिके देतात; परंतु त्यातही चिंतामणी कलामंच या संस्थेने वैविध्य जोपासले आहे. साधारण ४ फूट उंचीचे सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांना गौरविण्यात येते. चिंतामणी कलामंच यांनी यापूर्वी लघुपट म्हणजेच शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजनही केले आहे. संस्थेमार्फत मुलांसाठी, स्त्रियांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. सदर कार्यक्रमाला इंडियन ऑईल को. लिमी.,भारत पेट्रोलियम को. लिमी., हिंदुस्तान पेट्रोलियम यांचे प्रायोजकत्व लाभले.
तसेच प्रहार वृत्तपत्र हे माध्यम प्रायोजक होते. चिंतामणी कलामंचचे अध्यक्ष प्रथमेश दीपक पिंगळे, खजिनदार पूजा मोहिते-पिंगळे आणि स्पर्धाप्रमुख दिव्या पेटकर यांच्या नेतृत्वाखाली दि. ७ जानेवारी, २०२५ रोजी मुंबईतील यशवंत नाट्यगृह, माटुंगा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे या विभागातील संस्थांची आणि महाविद्यालय यांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली होती. सदर स्पर्धेचे परीक्षण मराठी चित्रपसृष्टीतील तसेच मराठी नाट्य सृष्टीतील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते समीर पेणकर आणि मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी तसेच रंगभूमीवरील नाटकांमधून कार्यरत असणारे, मोठ्या पडद्यावरील चित्रपटातून झळकणारे सुप्रसिद्ध अभिनेते सुनील जाधव यांनी निरपेक्षपणाने केले.
अंतिम फेरीत विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम – चिनाब से रावी तक (क्रावुड नाट्य संस्था आणि स्टोरीया प्रोडक्शन)
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय (विभागून) – ब्रम्हपुरा (महर्षी दयानंद महाविद्यालय
आणि (विभागून) कुक्कुर – सतिषप्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट लेखन – प्राजक्त देशमुख (चिनाब से रावी तक)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संकेत पाटील, संदेश रणदिवे ( चिनाब से रावी तक)
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना – श्याम चव्हाण (ब्रम्हपुरा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – अक्षय धांगट (कुक्कुर)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य – देवआशिष भरवडे, राहुल डेंगळे (चिनाब से रावी तक)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अजिंक्य नंदा (चिनाब से रावी तक)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – संजीवनी हसबे (चिनाब से रावी तक)
स्पर्धेला हेमंत जाधव, मयुरी पारकर, पराग परब, हर्षद घाडीगावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या स्पर्धेला मयुरी दंडवते, अजय पाटील, योगिता पाटील, आकाश घडवले, कल्पेश सकपाळ, अनिरुद्ध कुपटे, सोनाली नाडकर, योगेश पाटील, आशिष साबळे, गौरव बोंद्रे, आनंद कोरी, साहिल नार्वेकर, आविष्कार भालेराव, यश कदम, भरत बारे यांचे स्वयंसेवक म्हणून सहकार्य लाभले.