Monday, May 12, 2025

महाराष्ट्र

HSC Exam Hall Ticket Online : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! १२ वी परीक्षेचं हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध

HSC Exam Hall Ticket Online : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! १२ वी परीक्षेचं हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध

मुंबई : फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अत्यंत महत्वाच्या १२ वी परीक्षेचं हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध झालं आहे. हे हॉल तिकीट कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारपासून (दि १०) उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हॉल तिकीट पाहावे. यासंदर्भात विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण आल्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.



उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावी परीक्षेची ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क महाविद्यालय व उच्च माध्यमिक शाळा आकारू शकत नाही. हॉल तिकिटाच्या प्रिंटवर मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. ज्या आवेदनपत्रांना ‘पेड’ असे स्टेटस प्राप्त झाले आहे त्यांचेच हॉल तिकीट ‘पेड स्टेटस एडमिट कार्ड’ या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. तसेच हॉलतिकिटावरच्या फोटोमध्ये काही अडचणी असल्यास विद्यार्थ्याचा फोटो चिटकवून त्यावर प्राचार्यांचा शिक्का, स्वाक्षरी असणे गरजेचे आहे अन्यथा ते हॉलतिकीट ग्राह्य धरण्यात येणार नाही असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.

Comments
Add Comment