भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील ओवळी गावात भंगाराच्या गोदामाला आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणात पेपर रोल होते. या पेपर रोलमुळे आग झपाट्याने पसरली आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. गोदाम जळून खाक झाले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने कारवाई सुरू केली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही पण वित्तहानी झाली आहे.