मुंबई : मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या एका सुशिक्षित व्यक्तीने लग्नाच्या काही वर्षांनंतर महिलेसारखे कपडे परिधान करणे, मेकअप करणे असे विचित्र प्रकार तो करत होता. एवढेच नाही तर त्याने ओठांवर लिपस्टिकही लावायला सुरुवात केली. याला पत्नीचा विरोध असून ती या सवयी पाहून थक्क झाली. तसेच, त्याने आधार कार्डमध्येही आपले नाव बदलले आहे. अखेर या सगळ्या गोष्टींना कंटाळून पत्नीने त्याच्याकडून घटस्फोट मागितला आहे. याप्रकरणी कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याचिका दाखल करणाऱ्या महिलेच्या वकिलाने सांगितले की, दोघांचेही लग्न २०१३ मध्ये झाले होते. इंजिनिअर एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. लग्नाच्या जवळपास चार वर्षांनंतर, २०१७ मध्ये एका मुलाचा जन्म झाला. त्यानंतर २०२१ पर्यंत दोघांचेही वैवाहिक जीवन चांगले चालले होते. २०२१ मध्ये कंपनीच्या कामामुळे इंजिनिअर पतीला बंगळुरूला जावे लागले. बंगळुरूवरून परत येताच त्याचे वर्तन पूर्णपणे बदलले. तो साडी नेसू लागला.
सुरुवातीला इंजिनिअरच्या पत्नीला वाटले की, तिचा पती मस्करी करत आहे. पण तो दररोज साडी नेसू लागला. साडी नेसण्यामागचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की, दररोज साडी परिधान करणे आवडत असून मला स्त्री व्हायचे आहे. यावेळी पत्नीने त्याला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो तिचे ऐकायला तयार नव्हता. त्याने स्त्री होण्यासाठी स्वतःवर उपचार करायचे ही ठरवले. याचबरोबर, या पतीने आपल्या पत्नीला १८ लाख रुपयेही दिले आणि स्वतः बंगळुरूमध्ये राहायला गेला.
यादरम्यान, घर चालवण्यासाठी इंजिनिअरच्या पत्नीने एका खाजगी कंपनीत काम करायला सुरुवात केली. त्याच्या पत्नीने त्याला समजावण्याचा वारंवार प्रयत्न करूनही काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर पत्नीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून ही आगळीवेगळी केस न्यायालयात सुरू आहे .
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…