Saturday, May 24, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

बचत योजनांचे खातेदार वाढविण्यासाठी टपाल विभागाची मोहीम

बचत योजनांचे खातेदार वाढविण्यासाठी टपाल विभागाची मोहीम

अकोला :  पोस्टाच्या विविध बचत योजनांचे खातेदार वाढविण्यासाठी अकोला टपाल कार्यालयाने मोहिम हाती घेतली आहे. त्यादरम्यान पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकेची (पीओएसबी) अधिकाधिक खाती नागरिकांनी उघडावीत, असा प्रयत्न करण्यात येणार आहे.

प्रवर डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांनी शहरातील मुख्य टपाल कार्यालयात बुधवारी बैठक घेऊन याबाबत नियोजनाच्या सूचना केल्या. टपाल विभागाच्या बचत योजनांचे व्याजदर इतर संस्थांच्या तुलनेने अधिक आहेत. बचत खाते, आरडी, महिला सन्मान खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकासपत्र, जीवन विमा, ग्रामीण जीवन विमा अशा अनेक योजना आहेत.

या योजनांचा नागरिकांना लाभ मिळण्यासाठी दि. १३ ते १८ जानेवारीदरम्यान मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. अंभोरे यांनी केले.

बैठकीला सहायक अधीक्षक एन. एस. बावस्कार, गणेश सोनुने, वरिष्ठ पोस्टमास्तर शरद शेंडे, विपणन अधिकारी गजानन राऊत, तसेच शहरातील सर्व पोस्टमास्तर, बार्शिटाकळी, पातूर, पारस, निंबा, दहीहंडा, वाडेगाव येथील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment