Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरPalghar Water Shortage : पालघर जिल्ह्यात महिलांची पाण्यासाठी वणवण थांबणार?

Palghar Water Shortage : पालघर जिल्ह्यात महिलांची पाण्यासाठी वणवण थांबणार?

पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याचे आमदारांचे आश्वासन

सफाळे : पालघर शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा कृत्रिम पाणीटंचाईचा (Water Shortage) प्रश्न गंभीर बनत चालला असून, यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र गावित यांनी नुकताच एका बैठकीत दिले. त्यामुळे आता जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी महिलांची पाण्यासाठी हाेत असलेली वणवण थांबण्याची शक्यता आहे.

Nilesh Rane : आजपासून ‘गाव तिथे शिवसेना शाखा’ अभियान!

सध्या पालघर भागातील सातपाटी, मोरेकुरण, दापोली, उमरोळी, पंचाळी, पडघे, कमारे, अशा अनेक गावांमध्ये पाण्याचा पुरवठा अपुरा असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गावांना पालघर नगर परिषदेसह २६ गावाला पाणीपुरवठा केला जातो. आज पालघर जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे पालघर नगर परिषद क्षेत्रात मोठमोठ्याला इमारती उभ्या होत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली असून त्याचबरोबर या २६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी अपुरे पडत आहे. त्यासाठी वाढीव पाण्याची मागणी शासनाकडे करणे आवश्यक आहे. यासाठी आमदारांनी प्रयत्न करावेत अशी मागणी या गावातील सरपंचांनी केल्यावर आमदार गावीत त्यांनी वाढीव पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील पाणीटंचाईमुळे स्थानिक लोकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असून, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आमदार गावित यांनी या संदर्भात स्थानिक प्रशासन आणि जलपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी आढावा बैठक सोमवारी सहा जानेवारी रोजी पालघर येथे घेण्यात आली. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी विविध योजना राबवण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, स्थानिक गावकऱ्यांनी पाणीवापराचे सुयोग्य नियोजन करण्याचे आवाहन करत, पाणी वाचवण्याच्या मोहिमेत सहभाग घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

“प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व पुरेसा पिण्याचा पाणीपुरवठा मिळणे हा माझा प्रमुख प्राधान्याचा विषय आहे. या समस्येच्या तातडीच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन पाइपलाइन, जलकुंभ उभारणी, तसेच जलस्रोत व्यवस्थापनाच्या उपाययोजना राबवण्यात येतील,” असे आमदार गावित यांनी स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -