Monday, May 12, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

मुंबईत अनधिकृत बांधकामावरील कारवाईला वरुण सरदेसाईंचा विरोध

मुंबईत अनधिकृत बांधकामावरील कारवाईला वरुण सरदेसाईंचा विरोध
मुंबई : अनधिकृत बांधकामावरील कारवाईला उद्धव ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विरोध केला आहे. वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. याच भागातील भारतनगर भागात अनधिकृत बांधकामांवर झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने कारवाई सुरू केली होती. पण वरुण सरदेसाई यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याला विरोध केला.



अनधिकृत बांधकाम प्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने १७८ जणांना नोटीसा बजावल्या होत्या. झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या नियोजीत प्रकल्पासाठी त्यांच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठीच या नोटिसा देण्यात आल्या होत्या. नोटिसा बजावून कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई सुरू होती. पण आमदार वरुण सरदेसाई यांनी अनधिकृत बांधकाम हटविण्याला विरोध केला.



कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती आणल्याचा दावा वरुण सरदेसाई यांनी उपस्थित जमावासमोर बोलताना केला. ज्यांचे बांधकाम पाडणार आहात त्यांना पर्यायी जागा द्या, आधी पुनर्वसन करा नंतर कारवाई करा; अशी मागणी वरुण सरदेसाई यांनी केली.
Comments
Add Comment