नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील तिरूपती देवस्थान हे भारतातील इतर देवस्थानांपैकी एक मोठे भक्तीमय स्थान आहे. येथे बुधवारी रात्री चेंगराचेंगरी(Tirupati Stampede) झाली. या चेंगराचेंगरीत ६ लोकांचा मृत्यू झाला. खरंतर तिरूपती मंदिराच्या विशेष वैकुंठ द्वार दर्शनसाठी ८ ठिकाणी टोकन काऊंटर बनवण्यात आले होते. या दरम्यान बैरागी पट्टेदा आणि एमजीएम स्कूलच्या काऊंटवर गोंधळ झाला. येथे हजारोच्या संख्येने गर्दी होती. या चेंगराचेंगरीत अनेक लोक दबले गेले. यात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले. या मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
तिरूपती मंदिरात झालेल्या दुर्घटनेत २५ जण जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या अपघाताप्रकरणी दु:ख व्यक्त केले. टोकन घेण्यासाठी बनवण्यात आलेल्या केंद्रांवर टोकन वाटण्यास सुरूवातही केली नव्ही. मात्र त्याआधीच चेंगराचेंगरी झाली आणि इतकी मोठी दुर्घटना घडली. आज सकाळी १० वाजता चंद्राबाबू नायडू जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचतील.
दर वर्षी वैकुंठ एकादशीला तिरूपती वैकुंठ द्वार दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या काळात तिरूपती दर्शनसाठी येतात. यावेळेस वैकुंठ द्वार दर्शन १० जानेवारी ते १९ जानेवारीदरम्यान होत आहे. यासाठी टोकन वाटण्याची व्यवस्था करण्यात आली होती. टोकन ९ जानेवारीला सकाळी वाटले जाणार होते. यासाठी ८ जानेवारीच्या रात्रीपासूनच लोकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र टोकन वाटलेही गेले नाही आणि त्याआधीच ही दुर्घटना घडली.
पंतप्रधान मोदींनी या घटनेप्रकरणी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे.
वैकुंठ द्वार दर्शन १० ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान होणार आहे. प्रोटकॉलनुसार १० जानेवारीला दर्शन सकाळी साडेचार वाजल्यापासून सुरू होती.
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…