नागपूर : नागपूरमधील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये (Gorewada Rescue Center) तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान तपासणी अहवालातून या प्राण्यांना बर्ड फल्यूची लागण झाली असून या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र वाघ आणि बिबट्याला नेमका बर्ड फ्लू (Bird Flu) कसा झाला? याबाबत खळबळजनक खुलासा झाला आहे.
White rats : पिंपरी-चिंचवड महापालिका घेणार ९ लाख रुपयांचे पांढरे उंदीर
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील वाघ आणि बिबट्याला चिकन खालल्यामुळे बर्ड फ्लूची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर काय निष्पन्न होईल ते पाहावे लागेल. प्रादुर्भाव झालेले प्राणीसंग्रहालय तात्पुरते बंद करण्यात येणार असून प्राणीसंग्रहालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राण्यांना दिले जाणारे खाद्य तपासून द्यावे, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, चंद्रपूरमध्ये मानव आणि प्राण्यांमधील संघर्षाच्या घटना वाढत असल्याने या प्राण्यांचे स्थानांतरण करण्यात आले होते. मात्र, या रेस्क्यू सेंटरमध्ये आलेल्या प्राण्यांना पक्षी इन्फ्लुएंझाचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.