Wednesday, January 22, 2025
Homeक्रीडाIND vs ENG : विराट, रोहितच्या निवृत्तीनंतर भारताची पहिल्यांदा इंग्लंडशी टक्कर

IND vs ENG : विराट, रोहितच्या निवृत्तीनंतर भारताची पहिल्यांदा इंग्लंडशी टक्कर

मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील १-३ अशा पराभवानंतर आता नव्या वर्षात टीम इंडिया नव्या मिशनसाठी तयारी करत आहे. भारतीय संघ आता घरातच इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही एकदम खास मालिका असणार आहे.

खरंतर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोणत्याही फॉरमॅटमधील पहिली मालिका आहे. या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करणार आहे.

रोहित आणि कोहलीच्या अनुपस्थितीत त्याच्या खाद्यांवर इंग्लंड संघाला हरवण्याची जबाबदारी आहे. दरम्यान, कोहली आणि रोहितच्या निवृ्त्तीनंतर भारतीय संघाने अनेक टी-२०, वनडे सामने खेळलेत. मात्र इंग्लंडविरुद्धची ही पहिलीच मालिका असणार आहे.

गेल्या वेळेस टी-२० वर्ल्डकपमध्ये झाली होती टक्कर

गेल्या वेळेस भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सामना रंगला होता. तेव्हा सेमीफायनलमध्ये हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यावेळेस रोहित शर्माच्या हाती नेतृत्व होते. २७ जून २०२४मध्ये गुयानामध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला ६८ धावांनी मात दिली होती. त्यानंतर भारतीय संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. तेथे त्यांनी दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवत खिताब जिंकला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -