Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

तुम्ही Zomatoवरून खायला मागवता का? तर ही बातमी तुमच्यासाठी

तुम्ही Zomatoवरून खायला मागवता का? तर ही बातमी तुमच्यासाठी

मुंबई: प्रसिद्ध फूड डिलीव्हर कंपनी Zomato सातत्याने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकण्यासाठी विविध सर्व्हिस लाँच करत असते. नुक्त्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार Zomato Appवर नवे फीचर समोर आले आहे. यात १५ मिनिटात डिलीव्हरीचा टॅब देण्यात आला आहे.


एका मिडिया रिपोर्टनुसार Zomato अॅप हा पर्याय दिzसला मात्र अद्याप Zomatoकडून कोणत्याही या प्रकारे या फीचरची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. Zomato Appच्या आत दिलेल्या या सेक्शनमध्ये गेल्यावर समजते की लवकर तयार होणारे तसेच रेडी टू ईट पदार्थांचा यात समावेश आहे. यात निवडक रेस्टॉरंटच्या नावाचा समावेश आहे.



किती किलोमीटरची रेंज


ही सेवा केवळ २ किमीच्या रेजमध्ये येणाऱ्या रेस्टॉरंटला दाखवले. तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये रेस्टॉरंटच्या संख्येत वाढही होऊ शकते. Zomato च्या या नव्या सर्व्हिसचा मुकाबला swiggyच्या Boltशी होईल. swiggyच्या Boltमध्ये १० मिनिटांत फूडची गॅरंटी मिळते.


swiggyने आपल्या बोल्ट सर्व्हिसची सुरूवात गेल्या वर्षी ऑक्टोबकमध्ये केली होती. आता झोमॅटोही याला टक्कर देण्यासाठी सर्व्हिस घेऊन येत आहे.


१० मिनिटांत फूड डिलीव्हरीची गॅरेंटी देणाऱ्या अनेक सर्व्हिस मार्केटमध्ये आहेत. यात Olaच्या Ola Dash ही सर्व्हिस आहे. क्विक फूड डिलिव्हरी Zepto cafe सर्व्हिस आहे. ही सर्व्हिसही लोकप्रिय आहे. Blinkitआधीपासूनच आहे. हा एक ग्रोसरी प्लॅटफॉर्म आहे. याच्या मदतीने तुम्ही खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तू लगेचच मागवू शकता.

Comments
Add Comment