रायपूर: छत्तीसगडच्या मुंगेलीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. एका प्लांटची चिमणी पडल्याने तिच्याखाली अनेक मजूर दबले गेले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या चिमणीखाली कमीत कमी २५ मजूर अडकल्याचे सांगितले जात आहे. तसेच यात काही मजुरांचा मृत्यू झाल्याचीही शक्यता आहे.
दुर्घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या. तसेच मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही घटना सरगाव ठाणे क्षेत्रातील रामबोड भागात घडली.
Major accident at the under-construction Kusum plant in Mungeli, Chhattisgarh. pic.twitter.com/cpPsmrkTjo
— BIKASH KUMAR JHA (@bikash_jha_) January 9, 2025
दुर्घटना झाली त्या ठिकाणीी लोखंडाचे पाईप बनवल्या जाणाऱ्या फॅक्टरीच्या निर्मितीचे कार्य सुरू होते. कुसुम असे या कंपनीचे नाव आहे. याचा प्लांट तयार केला जात होता. त्या ठिकाणी चिमणीचे काम सुरू होते. यावेळेस ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सातत्याने परिस्थितीची निगराणी केली जात आहे. ज्या मजुरांना बाहेर काढले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले जात आहे.
मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी व्यक्त केला शोक
मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. तसेच दुर्घटनेची माहिती मिळतात तातडीने अधिकाऱ्यांना बचावकार्याबाबतचे आदेश दिले आहेत.