Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Tejshree Pradhan : तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट!

Tejshree Pradhan : तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट!

मुंबई : मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आणि नावाजलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमीच आपल्या चाहत्यांना नवनवीन रुपात पहायला मिळते.तेजश्रीची प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताची भूमिकाही चाहत्यांना फार भावली होती.चाहत्यांनी तिच्या मुक्ताच्या अभिनयाला भरभरून प्रेम दिले. तेजश्रीच्या 'हॅशटॅग तदेव लग्नम्' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, अशातच तेजश्रीने प्रेमाची गोष्ट या मालिकेला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे.

माहितीनुसार, तेजश्रीने 'स्टार प्रवाह' वरील प्रेमाची गोष्ट या मलिकेला रामराम करणार आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेतूनही तेजश्रीचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळाला. मालिकेतील मुक्ताला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.परंतु, अचानक तिच्या मालिका सोडण्याच्या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. ही मालिका सोडल्यानंतर एक वेगळा चेहरा मुक्ताच्या अभिनयात पहायला मिळणार आहे. मराठीसह हिंदी मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री मुक्ताची भूमिका साकारणार आहे. हे असलं तरी, तेजश्री प्रधान हिने मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला? हे अद्याप अस्पष्ट आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताची जागा आता अभिनेत्री स्वरदा ठिगळे घेणार आहे. माझे मन तुझे झाले, ताराराणी यासारख्या मालिकांमध्ये स्वरदाने आपली छाप पाडली आहे. आता स्वरदा मुक्ताच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लवकरच ती मुक्ताच्या भुमिकेसाठी मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात करणार आहे.

Comments
Add Comment