Monday, June 30, 2025

Pritish Nandy: फिल्ममेकर प्रितीश नंदी यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन

Pritish Nandy: फिल्ममेकर प्रितीश नंदी यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन
मुंबई: प्रसिद्ध फिल्ममेकर, कवी आणि लेखक प्रितीश नंदी यांचे निधन झाले आहे. ते ७३ वर्षांचे होते. अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यांनी एक्सवर पोस्ट करत नंदी यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.

अनुपम खेर यांनी लिहिले, माझे सर्वात प्रिय आणि जवळच्या मित्रांपैकी एक प्रीतीश नंदी यांच्या निधनाबाबत सांगतान मी खूप दु:खी आणि स्तब्ध आहे. अद्भुत कवी, लेखक, सिने निर्माता आणि एक बहादूर तसेच अद्वितीय संपादक आणि पत्रकार. मुंबईतील सुरूवातीच्या दिवसांमध्ये ते माझी सहाय्यता प्रणाली आणि शक्तीचा मोठा स्त्रोत होते. आम्ही अनेक गोष्टी शेअर केल्या.

 


प्रितीश नंदी यांचे करिअर


प्रीतीश नंदी एक पत्रकारही होते. त्यांनी१९९०च्या दशकात दूरदर्शनवर द प्रीतीश नंदी शो नावाचा टॉक शो होस्ट केला होता. या शोमध्ये प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या जात. त्यांनी २०००च्या दशकाची सुरूवातही आपला बॅनर प्रीतीश नंदीी कम्युनिकेशन अंतर्गत सूर, काँटे, झंकार बीट्स, चमेली, हजारो ख्वाहिशे ऐसी, प्यार के साईड इफेक्ट्स सारखे सिनेमे बनवले होते. याशिवाय त्यांच्या कंपनीने वेब सीरिज फोर मोर शॉट्स प्लीज आणि एंथोलॉजी सीरीज मॉडर्न लव्ह मुंबईचीही निर्मिती केली होती.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >