पुणे: महाराष्ट्राच्या पुण्यातील एका बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय महिलेवर मंगळवारी संध्याकाळी तिच्या सहकाऱ्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येरवडा स्थित एका कंपनीच्या पार्किंगच्या ठिकाणी ही घटना घडली.
मृत महिलेची ओळख शुभदा कोदारी अशी झाली आहे तर आरोपीचे नाव कृष्णा कनोजा होते. हा आरोपी फर्ममील अकाऊंट सेक्शनमध्ये काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक माहितीनुसार कंपनीच्या पार्किंगमध्ये संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संशयिताने धारदार शस्त्राने महिलेवर हल्ला केला. हा हल्ला उधारीच्या पैशावरून झालेल्या वादातून करण्यात आला.
महिलेचे खूप रक्त वाहत होते. तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपी कनोजाला ताब्यात घेण्यात आले आणि मृत महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उधारीच्या पैशाच्या वादातून हत्या झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहे. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात हैराण करणारी बातमी समोर आली होती. येथे चकेरीच्या अहिरवांमध्ये पान दुकानदाराची हत्या करण्यात आली. सिगरेट घेण्यासाठी पोहोचलेल्या आरोपीकडे दुकानादाराने आधीची उधारी मागितली. यामुळे तो आरोपी चिडला आणि त्यानंतर दुकानदाराच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने हल्ला केला. मात्र उपचारादरम्यान या दुकानदाराचा मृत्यू झाला.