Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Siddharameshwar Yatra : श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल!

Siddharameshwar Yatra : श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल!

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त (Siddharameshwar Yatra) नंदीध्वजांची मिरवणूक काढली जाते. यात्रेसाठी चार ते पाच लाख भाविक येतात. त्यामुळे वाहतुकीचा अडथळा (Traffic Jam) होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर १२ ते १६ जानेवारीपर्यंत शहरातील सहा मार्गांवरील वाहतुकीत बदल करून त्या मार्गांवरील वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत.



कोणते मार्ग बंद?


यात्रेच्या निमित्ताने विजापूर वेस ते पंचकट्टा, लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा, भारतीय स्टेट बॅंक ट्रेझरी शाखा (पूजा ऑफिस स्टेशनरी दुकान) ते पंचकट्टा, भारतीय स्टेट बॅंक ट्रेझरी शाखा ते पंचकट्टा, पार्क चौक ते मार्केट चौकी आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशाला ते डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह हे मार्ग १२ ते १६ जानेवारीपर्यंत सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. त्या वाहनांसाठी विजापूर वेस ते बेगमपेठ पोलिस चौकीमागून मार्ग उपलब्ध असणार आहे.

पूनम चौक- रंगभवन चौक- सात रस्ता- जुना एम्प्लॉयमेंट चौक- डफरीन चौक ते पार्क चौक असा मार्ग देखील त्या मार्गांवरील वाहनांसाठी उपलब्ध असणार आहे. दुसरीकडे, श्री सिद्धरामेश्वर मंदिर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, संमती कट्टा परिसर व होम मैदान या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतात. श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर हा सर्व परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Comments
Add Comment