मुंबई : १९ फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ला(Champions Trophy) सुरूवात होत आहे.त्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या तीन लढती भारताकडे सरावासाठी आहेत.चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या तयारीसाठी ही वन डे मालिका महत्त्वाची आहे. टी-२० वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघातील बरेचसे सीनियर खेळाडू भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुन्हा खेळताना दिसणार आहे.पण, संघ निवडीचा पेच अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमॉनला संधी मिळणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
रोहित शर्मा या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे हे तर पक्के आहे. उप कर्णधारपदी शुभमन गिलच्या जागी जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याची निवड होण्याचा अंदाज आहे. संजू सॅमसन याने शेवटचा वन डे सामना डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता आणि त्यात त्याने शतक झळकावले होते. तरीही त्याची श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत निवड झाली नव्हती. सॅमसनने २०२१ मध्ये भारताकडून वनडे पदार्पण केले.
KL Rahul : ऑस्ट्रेलियातून मायेदशी येताच विजय हजारे स्पर्धेतून केएल राहुलची माघार
तेव्हापासून, त्याने ODI फॉरमॅटमध्ये एकूण १६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५६.७ च्या अप्रतिम सरासरीने फलंदाजी करताना ५१० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १ शतक आणि ३ अर्धशतकं आली आहेत. एवढे सगळे असूनही संजूची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये निवड होण्याची शक्यता नाही. कारण, ऋषभ पंत हा बीसीसीआय व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पहिली पसंती आहे. मात्र, ऋषभची वन डे क्रिकेटमधील सरासरी ही संजूपेक्षा कमी आहे. त्यामुळे चाहते अजून नाराज झाले आहे.
ऋषभने ३१ वन डे सामन्यांत ३३.५०च्या सरासरीने ८७१ धावा केल्या आहे. त्यात १ शतक व ५ अर्धशतकं आहेत. तेच संजूने १६ सामन्यांत ५६.६६ च्या सरासरीने ५१० धावा केल्या आहेत. तेही १ शतक व ३ अर्धशतकांसह. असे असले तरी गौतम दिल्लीच्याच खेळाडूला संघात खेळवेल, अशी दाट शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही टीम इंडिया ऋषभ पंतच्या जागी केएल राहुलला विकेटकीपर फलंदाज म्हणून खेळवू शकते. जेणेकरून संघात एक अतिरिक्त ऑलराऊंडर किंवा गोलंदाज खेळवता येईल. संजू कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो, तरीही या सर्व गोष्टी लक्षात घेऊन संजू सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्थान मिळणे कठीण आहे.