Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

आंध्र प्रदेश: तिरूपती मंदिरात चेंगराचेंगरी दरम्यान ६ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

आंध्र प्रदेश: तिरूपती मंदिरात चेंगराचेंगरी दरम्यान ६ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरूपती मंदिरात बुधवारी वैकुंठ द्वार दर्शन तिकीच केंद्राजवळ झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान ६ भक्तांचा मृत्यू झाला आहे. खरंतर, सकाळपासून हजारोच्या संख्येने भक्तगण वैकुंठ द्वार दर्शन टोकनसाठी तिरूपतीच्या विविध तिकीट केंद्रांवर रांगेमध्ये उभे होते. वैकुंठ द्वार दर्शन दहा दिवसांसाठी खोलण्यात आले आहेत. यामुळे टोकनसाठी हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते.


यावेळी चेंगराचेंगरी झाल्याने एकच गोंधळ झाला. या चेंगराचेंगरीदरम्यान चार जणांचा मृत्यू झाला. यात एका महिलेचाही समावेश आहे. परिस्थिती बिघडत असलताना तिरूपती पोलिसांनी मोर्चा सांभाळला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दर्शनासाठी टोकनच्या रांगेत ४ हजार लोक होते. स्थितीबाबत मंदिर समितीचे चेअरमन बीआर नायडू आपात्कालीन बैठक करत आहेत.


 


मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केले दु:ख


मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरूपतीमध्ये विष्णू निवासमजवळ तिरूमाला श्रीवारी वैकुंठ द्वारामध्ये दर्शनासाठी टोकन घेताना झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान चार भक्तांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्‍यांनी या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्‍यांनी यात जखमी झालेल्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांबद्दल माहितीही घेतली.

Comments
Add Comment