Wednesday, January 22, 2025
Homeक्रीडाChampions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण असणार टीम इंडियाचा नवा उपकर्णधार?

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण असणार टीम इंडियाचा नवा उपकर्णधार?

नव्या नावाची जोरदार चर्चा सुरु

नवी दिल्ली : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दारुण पराभव झाल्यावर आता टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध टी- २० आणि वनडे सीरिज खेळणार आहे. घरच्या मैदानावर ही सीरिज खेळल्यावर टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी (Champions Trophy 2025) उतरायचे आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान पाकिस्तानात खेळवण्यात येईल. तर चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सर्व सामने हे दुबईत होतील. रोहित शर्मा (Rohit Sharma) हाच २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा कर्णधार असेल याची घोषणा भारताने २०२४ वर्ल्ड कप जिंकल्यावरच करण्यात आली होती. मात्र आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा उपकर्णधार कोण असणार याच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Salman Khan : सलमानच्या सुरक्षेत वाढ! घराला बुलेटप्रूफ काच तर भिंतीवर काटेरी तार

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार कोण असेल याबाबत जोरदार चर्चा आहे. टी-२० वर्ल्ड कपनंतर शुभमन गिलचा भारताच्या लीडरशिप ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आणि त्याला व्हाईट बॉल संघांचा उपकर्णधार बनवण्यात आले. हार्दिक पंड्या हा वर्ल्ड कप २०२४ मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार होता. हाती आलेल्या माहितीनुससार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या वनडे संघात महत्वपूर्ण बदल केले जाऊ शकतात. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह २०२५ मध्ये भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा उपकर्णधार असेल. २०२२ मध्ये साऊथ आफ्रिके विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये बुमराह टीम इंडियाचा उपकर्णधार होता, तर २०२३ मध्ये आयर्लंड विरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये त्याने भारताचे नेतृत्व सुद्धा केले आहे.

बुमराहला मिळणार मोठी जबाबदारी?

भारतीय क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळात बरेच काही घडले आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात हार्दिकला उपकर्णधारपदावरून हटवून शुभमन गिलकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, आता मीडिया रिपोर्ट्समध्ये आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

हार्दिक (Hardik Pandya) किंवा गिल (Shubhman Gill) या दोघांनाही उपकर्णधारपद दिले जाणार नाही. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पर्थ आणि सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाच नेतृत्व करणारा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला त्याच्या परफॉर्मन्ससाठी प्लेअर ऑफ द सीरिजच्या पुरस्काराने सन्मानित केले. तसेच जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumra) या सीरिजमध्ये त्याच्या गोलंदाजीचा जबरदस्त परफॉर्मन्स देखील दाखवला. यासह त्याने भारताचे कर्णधारपद देखील सांभाळले. त्यामुळेच बुमराहकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी असु शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -