Monday, May 12, 2025

ताज्या घडामोडीश्रध्दा-संस्कृती

Vastu TIps : या वास्तु उपायांसाठी खर्च होणार नाही एकही रूपया मात्र घरात येईल लक्ष्मी

Vastu TIps : या वास्तु उपायांसाठी खर्च होणार नाही एकही रूपया मात्र घरात येईल लक्ष्मी

मुंबई: नव्या वर्षात सगळेचजण आपल्यासाठी मंगलकामना करतात. अशातच अनेकजण तंत्रमंत्राच्या तज्ञांकडून पैशाने तिजोरी कशी भरता येईल याचे उपाय करत असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला वास्तुचे असे काही सोपे उपाय सांगणार आहोत ज्यासाठी तुम्हाला एक रूपयाही खर्च करावा लागणार नाही आणि घरात लक्ष्मीचे आगमनही होते.



स्वस्तिक


वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरावाजावर कुंकूच्या सहाय्याने स्वस्तिक बनवा. हे स्वस्तिक नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रूंद असला पाहिजे. असे म्हणतात की स्वस्तिकमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वास्तुदोष असल्यास ते नष्ट होतात.



किचन


किचन घराचा महत्त्वाचा भाग आहे. तसेच ते एक पवित्र स्थान आहे. किचन हे नेहमी आग्नेय दिशेला म्हणजे दक्षिण -पूर्व दिशेला बनवणे सगळ्यात योग्य मानले जाते. लक्षात ठेवा घराच्या मुख्य दरवाजासमोर अग्नि अथवा जल तत्वाची व्यवस्था असू नये. येथे पाण्याचा नळ किंवा गॅस ठेवू नका.



तुळस


शास्त्रामध्ये तुळशीला लक्ष्मी मातेचे स्वरूप मानलतात. असे म्हणतात की घराच्या अंगणात उत्तर अथवा उत्तर पूर्व दिशेला तुळशीचे झाड लावणे शुभ असते.

Comments
Add Comment