Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीधक्कादायक! लग्नाच्या २६व्या वाढदिवसाला लग्नातले कपडे घातले, नंतर केली आत्महत्या

धक्कादायक! लग्नाच्या २६व्या वाढदिवसाला लग्नातले कपडे घातले, नंतर केली आत्महत्या

नागपूर: नागपूरच्या जरीपटका परिसरातील मार्टिननगर भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पती-पत्नीने लग्नाच्या २६व्या वाढदिवसालाच आत्महत्या केली. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि मृतदेह ताब्यात घेतला. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. पती-पत्नीच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

मृत दाम्पत्य जेरील डासमोन ऑस्कर मॉनक्रीफ(४८) आणि एनी जेरील मॉनक्रीफ(४५) अनेक वर्षांपासून मूल होत नसल्याने तसेच बेरोजगारीमुळे त्रस्त होते. लग्नाच्या २६ वर्षानंतरही त्यांना मूलबाळ नव्हते.

पती-पत्नीने गळफास लावून घेत केली आत्महत्या

७ जानेवारी २०२५ला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या दिवशी त्यांनी आत्महत्येच्या आधी लग्नातील कपडे घातले. त्यानंतर व्हिडिओ बcनवला आणि त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर अपलोड केला. यानंतर त्यांनी घरातील नायलॉनच्या दोरीने फाशी लावून घेत आत्महत्या केली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि प्रकरणाचा तपास सुरू केली. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १९४ अंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्याकडून कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. ही आत्महत्या मूल न होत असल्यामुळे तसेच बेरोजगारीमुळे तणाव वाढल्याने करण्यात आली.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपूरमध्ये अशा प्रकारच्या घटना सातत्याने वाढत आहेत. यावरून मानसिक आरोग्य तसेच आर्थिक दबाव अशा प्रकारच्या समस्या वाढत असल्याचे चित्र दर्शवते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -