
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात (Baba Siddique Murder Case) मोठा खुलासा झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून (Bishnoi Gang) सलमान खानला (Salman Khan) जीवेमारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेबाबत सातत्याने पावले उचलली जात आहेत. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर आता सलमान खानच्या गॅलेक्सी अपाट्रमेंटच्या (Galaxy Apartment) बाल्कनीमध्ये बुलेट प्रूफ काच (Bullet proof Glass) लावण्यात येत आहे.

मुंबई : देवाचं घर म्हणजे काय? ते नक्की कुठे असतं? या एका लहान मुलीला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटातून मिळणार आहे. या ...
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेला लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. सलमान खानच्या घराला बुलेट प्रूफ काच लावण्यात आली आहे. तसेच गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सीमा भिंतीवर काटेरी तारही टाकण्यात येत आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. एवढंच नाही तर अत्याधुनिक सुरक्षा उपकरणंही याठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. (Salman Khan)