डोंबिवली: जळगाव येथे वीज बिलांवर उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याने हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याची माहिती आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. ही बाब जर चुकून झाली असेल तर ठीक मात्र जर हेतुपरस्पर घडत असेल तर संबधीतांवर शासन म्हणून कारवाई करण्यात येईल असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
रविवारी भाजपच्या देश राज्यव्यापी अभियानातर्फे डोंबिवलीत आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शेलार नाका येथे संघटन पर्व या उपक्रमास सुरुवात करण्यात आली त्यावेळी आमदार चव्हाण यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले.
अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आता देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले अशी माहितीही त्यांनी दिली. जळगावात महावितरण कंपनीच्या वीजेच्या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याचे दिसून आले आहे. वीज बिलांवर ठाकरेंचा फोटो पाहून ग्राहकांमध्ये चर्चा होत आहे.
भाजपच्या देश राज्यव्यापी अभियानातर्फे डोंबिवलीत आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शेलार नाका येथे संघटन पर्व या उपक्रमास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराघरात जाऊन प्राथमिक सदस्य अभियानाची सुरुवात करा असे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर रविवारी डोंबिवलीत सदर अभियानाची सुरुवात झाली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आकर्षण आहे. महायुती सरकार आल्यानंतर चांगलं वातावरण आहे. तरुण-तरुणींचे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यासाठी भाजप युवा मोर्चातर्फे सात ते दहा तारखेपर्यंत महाविद्यालयाच्या बाहेर कॅम्प लावण्यात येणार आहेत. 18 ते 24 वर्ष वयोगटापर्यंत 25 लाखाहुन अधिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी आमदार चव्हाण यांनी सांगितले.