Jilabi Trailer : 'जिलबी'चे रहस्य १७ जानेवारीला उलगडणार, ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : नितीन कांबळे दिग्दर्शित ‘गोड आणि गूढ’ अशा दोन्ही फ्लेवर्सच्या ‘जिलबी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. याप्रसंगी 'जिलबी'ची टीम उपस्थित होती. चांगल्या निर्मिती मूल्यांमुळे मराठी चित्रपटांचा निर्मिती आणि वितरणाचा कॅनव्हास मोठा होईल, असा विश्वास कलाकारांनी याप्रसंगी व्यक्त केला. एका चांगल्या संकल्पनेसोबतच ताकदीचे कलाकार आणि उत्तम दिग्दर्शक या सगळ्यांमुळे वेगळ्या धाटणीचा ‘जिलबी' प्रेक्षकांनाही आवडेल, असा विश्वास निर्माते आनंद पंडित यांनी व्यक्त केला. या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून हे ‘रहस्य’ प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल, असा विश्वास दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी व्यक्त केला.



‘रहस्याच्या सावल्यांत दडलेला आहे खेळ, विश्वासाचा प्रवास की फसवणुकीचा जाळ??’ ! असं म्हणत प्रदर्शित झालेल्या या ट्रेलर मधून जबरदस्त रहस्याची झलक दिसून येत आहे. आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. अशाच घडणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याची उकल येत्या १७ जानेवारीला चित्रपटगृहात होणार आहे. रहस्य, थरार, उत्कंठा, शोध, संशय, समज-गैरसमज या सगळ्यांच्या संमिश्र मांडणीच्या या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे ‘जिलबी’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या तिघांसोबत पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांनी आपल्या अभिनयाने मनोरंजनाच्या या ‘जिलबी’चा खुसखुशीतपणा वाढवला आहे. एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट,उत्कृष्ट कलाकार यांना एकत्र पाहण्याची पर्वणी ‘जिलबी’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना लाभणार आहे.



‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेन्ट प्रा.लिमिटेड यांच्या सहयोगाने आणलेला ‘जिलबी’ चित्रपट १७ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
Comments
Add Comment

Bigg Boss Marathi 6 : तुझ्या आईची...'; तू मला नॉमिनेट करतो! बिग बॉसच्या घराबाहेर दोन स्पर्धकांमध्ये मारामारी ? VIDEO व्हायरल

मुंबई : 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतरही स्पर्धकांमधील वाद निवळण्याचं नाव घेत नाहीयेत. नुकतेच स्ट्रॉंग

Apurva Nemlekar: अपुर्वा नेमळेकरने चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का, पोस्ट करत...

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत चाहत्यांना

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा