Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीश्वसनाशी संबंधित आजारांवर देखरेख ठेवण्याचे राज्यांना निर्देश

श्वसनाशी संबंधित आजारांवर देखरेख ठेवण्याचे राज्यांना निर्देश

एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली: देशात एचएमपीव्ही व्हायरसचे ७ रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य आरोग्य सचिव, अधिकारी आणि युनिट्सची ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी केंद्रीय सचिवांनी राज्यांनी श्वसनाच्या आजारावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

या बैठकीत आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बहल, आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम , भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) आणि आयडीएसपीच्या राज्य देखरेख युनिट्सचे तज्ञ उपस्थित होते. देशात एचएमपीव्हीचे रूग्ण आढळ्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट मोडवर आहेत. केंद्र सरकारने राज्यांना इन्फ्लूएंझा सारखा आजार आणि तीव्र श्वसन संसर्ग श्वसन आजारांवर देखरेख वाढवण्याचा आणि मानवी मेटाप्न्यूमोव्हायरसच्या (एचएमपीव्ही) प्रसाराला प्रतिबंध करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्‍याचा सल्ला दिला आहे.

सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांसाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांती मंगळवारी बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले की, एचएमपीव्ही अनेक श्वसन विषाणूंपैकी एक आहे. ज्याचा सर्व वयोगटातील लोकांना विशेषतः हिवाळा आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या महिन्यांत संसर्ग होऊ शकतो. विषाणूचा संसर्ग सामान्यतः सौम्य आणि स्वयं-मर्यादित स्थितीत असतो. त्यामुळे बहुतेक रुग्‍ण स्वतःहून बरे होत आहेत. आयसीएमआर-व्हीआरडीएल प्रयोगशाळांमध्ये पुरेशा निदान सुविधा उपलब्ध आहेत अशी माहिती देखील केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली.

हिवाळ्याच्या महिन्यांत श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ दिसून येते, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. श्वसनाच्या आजारांच्या प्रकरणांमध्ये होणाऱ्या कोणत्याही संभाव्य वाढीसाठी देश सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य सचिवांनी बैठकीदरम्यान राज्यांना साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे; डोळे, नाक किंवा तोंडाला न धुता स्पर्श करणे टाळणे; रोगाची लक्षणे असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळणे; खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकणे इत्यादी सोप्या उपायांसह विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांमध्ये आयईसी आणि जागरूकता वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -