मुंबई: थंडीच्या दिवसांत शरीराला हेल्दी राखणे कठीण असते. यादरम्यान थोडासा जरी हलगर्जीपणा केला तर आजारांना आमंत्रण मिळू शकlते. अशातच या मोसमात आपल्या डाएटमध्ये अशा पदार्थांचा समावेश जरूर केला पाहिजे जे शरीराला आतून पोषण देतील आणि शरीर उबदार ठेवतील. थंडीच्या दिवसांत काही बियांचे सेवन लाभदायक ठरते.
बिया आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण यात प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स, व्हिटामिन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. खासकरून थंडीच्या दिवसांत याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमताही वाढते तसेच शरीरही उबदार राहते.
या बियांचे सेवन तुम्ही कच्च्या रूपात करू शकता. अथवा हे भिजवून अथवा भाजून खाल्ल्यास अधिक फायदेशीर ठरतात. कारण असे केल्याने त्यातील पोषकतत्वे अवशोषित करण्यास मदत मिळते.
अळशीच्या बिया
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. यामुळे हाडे मजबूत होतात तसेच हृदयासाठीही अतिशय फायदेशीर असते. अळशीच्या बियांमध्ये हेल्दी फॅटी अॅसिड असते जे आपल्या त्वचेसाठी चांगले असते. तुमच्या त्वचेसाठी हे वरदानापेक्षा कमी नाही. कारण अळशीच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि व्हिटामिन ई असते यामुळे कोलेजनचे उत्पादन होण्यास मदत होते तसेच त्वचा दीर्घकाळ तरूण राहते.
चिया सीड्स
चिया सीड्स वेट लॉसमध्ये जितके प्रसिद्ध आहे तितकेच स्किनसाठी अतिशय फायदेशीर आहे. चिया सीड्समध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. चिया सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट, फ्री रॅडिकल्स असतात तसेच हृदयाचे आरोग्य आणि कॅन्सरपासून बचाव होतो. चिया सीड्समध्ये फायबर असल्याने वजन घटवण्यास मदत होते. तसेच पाचन तंदुरुस्त राहते. चिया सीड्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे मिनरल्स असतात यामुळे हाडे मजबूत बनतात.
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. कारण यात अँटी ऑक्सिडंट, हेल्दी फॅट्स आणि मिनरल्स असतात. यामुळे नुकसान होते. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, ब्लड प्रेशर नियंत्रित राखण्यास मदत होते.