

भारतीय नौदलाचे बळ वाढवणार निलगिरी, सुरत आणि वाघशीर
मुंबई : शिवालिक श्रेणीची निलगिरी फ्रिगेट, कोलकाता श्रेणीची सुरत विनाशिका आणि स्कॉर्पिअन गटातील कलवरी श्रेणीची वाघशीर ही पाणबुडी या स्टेल्थ ...
यंदाच्या एअर शो मधील १०, ११ आणि १२ फेब्रुवारी हे तीन दिवस व्यावसायिक भागीदारी आवश्यक कार्यक्रमांकरिता असतील. तर १३ आणि १४ फेब्रुवारी या दोन दिवशी नागरिकांसाठी एअर शो चे आयोजन केले जाईल. हे एअर शो सामान्य नागरिकांना बघता येतील. या वर्षीच्या एरो इंडिया २०२५ मध्ये हवाई प्रात्यक्षिके आणि हवाई क्षेत्रातल्या व्यापक संरक्षण मंचाचे एका जागी मांडलेले प्रदर्शन यांचा समावेश असेल. पूर्वावलोकन, उद्घाटन समारंभ, संरक्षणमंत्र्यांचा परिसंवाद, सीईओंची गोलमेज परिषद, स्टार्ट-अप कार्यक्रम, चित्तथरारक प्रात्यक्षिके, इंडिया पॅव्हेलियनचा समावेश असलेले एक विशाल प्रदर्शन आणि एरोस्पेस कंपन्यांचा व्यापारमेळा असे एरो इंडिया २०२५ चे स्वरुप असेल.

काय आहे BHARATPOL PORTAL ? कसे काम करणार भारतपोल पोर्टल ?
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीबीआयच्या भारतपोल या पोर्टलचे लाँचिंग केले. इंटरपोलच्या धर्तीवर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ...
मित्र देशांसोबत संरक्षणविषयक धोरणात्मक भागीदारीबाबत संवाद सुरू करणे आणि वाढवणे यासाठी यंदाच्या एरो इंडिया कार्यक्रमात बिल्डिंग रेझिलिअन्स थ्रू इंटरनॅशनल डिफेन्स अँड ग्लोबल एंगेजमेंट या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे यजमानपद भारताकडे असेल. एरो इंडिया २०२५ च्या निमित्ताने संरक्षणमंत्री, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) अशा उच्चपदस्थांसोबत निवडक द्विपक्षीय बैठकांचेही आयोजन करण्यात आले आहे. मित्र देशांसोबतची भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी नव्या दालनांचा शोध घेऊन त्यांच्यासोबतच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातल्या संबंधांना बळकटी देण्यावर यामध्ये भर देण्यात येईल.