
पुणे : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) महायुतीचा (Mahayuti) दणाणून विजय झाला आहे. तर आता सर्व राजकीय पक्षांचे महापालिका निवडणुकांकडे (Municipal Elections) लक्ष लागले आहे. भाजपाने (BJP) आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने विरोधी पक्षांचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यासाठी पक्षाची दारे खुली केली आहेत. याचा फटका उबाठा (Uddhav Thackeray) गटाला बसत आहे. (Shivsena UBT Pune)

लखनऊ : चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं होतं. त्यानंतर चीनने पुन्हा एका नव्या व्हायरस उकळून काढला आहे. ...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवसेना उबाठा गटातील पाच माजी नगरसेवक उबाठा गटाला रामराम ठोकत भाजपामध्ये आज प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला पुणे शहरात मोठे खिंडार पडणार आहे. (Shivsena UBT Pune)
कोण करणार भाजपात प्रवेश?
- विशाल धनवडे
- बाळासाहेब ओस्वाल
- संगीता ठोसर
- पल्लवी जावळे
- प्राची आल्हाड