डॉ. सर्वेश सुहास सोमण
शेअर बाजारात अनेकदा फार मोठी वाढ किंवा फार मोठी विक्रमी घसरण पाहावयास मिळते. या मोठ्या चढ उतारात बहुतेक वेळा खालील गोष्टी कारणीभूत ठरतात.. आर्थिक घटक बदलणारे व्याज दर, घसरत चाललेली अर्थव्यवस्था, महागाई, चलनवाढ, कर वाढ, आर्थिक आणि राजकीय धक्के, आर्थिक धोरणातील बदल, भारतीय रुपयांचे बदलणारे मूल्य, पुरवठा आणि मागणी संतुलनात बदल असल्यामुळे शेअरची किंमत बदलते. जेव्हा स्टॉकची मागणी जास्त असते; परंतु कमी पुरवठा करतो, तेव्हा त्या शेअर्सच्या किमतीत वाढ होते. त्याचप्रमाणे, जर पुरवठा जास्त असेल; परंतु मागणी कमी असेल, तर शेअरची किंमत कमी होते. ग्लोबल मार्केट शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात वाढण्याचे किंवा अचानक मोठ्या प्रमाणात खाली जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक आर्थिक ट्रेंड. भारतीय अर्थव्यवस्था अनेक परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय व्यवसायांमध्ये मोठ्या भांडवलाची गुंतवणूक केली आहे. कधी कधी हे मोठे गुंतवणूकदार त्यांची गुंतवणुक शेअर मार्केटमध्ये अचानक वाढवतात किंवा शेअर्सची विक्री करतात ज्यामुळे स्टॉकमध्ये अत्यंत अस्थिरता येते. भारतीय कंपन्या परदेशी स्टॉक एक्सचेंजवर त्यांचे शेअर्स सूचीबद्ध करून देखील निधी उभारतात. जेव्हा अशा कंपन्यांतील शेअर्समध्ये जागतिक पातळीवर जेंव्हा खरेदी विक्री होते तेव्हा त्या कंपनीच्या शेअर्सवर लक्षणीय परिणाम होतो, ज्यामुळे देशांतर्गत स्टॉक मार्केटवर देखील त्याचा परिणाम होतो.
आंतरराष्ट्रीय घडामोडी – स्टॉकच्या किमतींवर परिणाम करणारे घटक अनेकदा परदेशातील आर्थिक गोष्टींवर देखील अवलंबून असतात. या घटकांमध्ये इतर देशातील स्थिती, त्यांच्या सरकारमध्ये होणारे बदल, युद्ध, अंतर्गत संघर्ष, अनपेक्षित नैसर्गिक आपत्ती आणि बरेच काही समाविष्ट असू शकते. शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात क्रॅश झाले तर ते ही तात्पुरते असते आणि सातत्याने घसरण किंवा सातत्याने फक्त वाढच होईल असे नसते. त्यामुळें हे महत्वाचे आहे की तुम्ही मोठ्या घसरणीत घाबरून न जाता घाई घाईने शेअर्स खरेदी किंवा विक्रीचा निर्णय न घेता अभ्यासपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असते.
पुढील काही आठवड्यांचा विचार करता निफ्टीची २३४२३४६० ही महत्वाची पातळी असून जर ही पातळी तुटली, तर निफ्टीमध्ये आणखी घसरण होईल. त्याचवेळी २४८०० ही महत्वाची विक्रीची पातळी असून जर ही पातळी तोडून यावर निर्देशांक निफ्टी स्थिरावली तरच पुन्हा निफ्टी अल्प मुदतीसाठी तेजीमध्ये येईल. पण एकूण अल्पमुदतीचा विचार करता २३४०० ते २४८०० या १४०० अंकांच्या मध्ये रेंजबाऊंड अवस्थेत निर्देशांक काही काळ घालवू शकतात.
(सुचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)
[email protected]