मुंबई: चाणक्य यांना भारतातील सर्वात विद्वान अर्थशास्त्री म्हटले जाते. त्यांची रचना चाणक्य निती आजच्या युगातील लोकांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे. चाणक्य यांच्यानुसार लग्न झालेल्या पुरुषाने आपल्या जीवनातील ३ गुपिते कधीही सांगू नयेत. हे नियम पाळणारे लोक नेहमी आपल्या जीवनात आनंदी असतात.
चाणक्य नितीनुसार एका विवाहित पुरुषाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या पत्नीची तक्रार तिसऱ्या व्यक्तीकडे करू नये. असे यासाठी कारण यामुळे तुमची पत्नी आणि तुम्ही दुसऱ्यांमध्ये हास्याचे पात्र ठरता. पत्नीशी संबंधित कोणत्याच गोष्टी इतर कोणाला सांगू नये.
आपल्या घरगुती तक्रारी कधीही बाहेरच्या लोकांसोबत कधीही शेअर करू नयेत. काही लोक थोडासा त्रास झाला तरी आपले दु:ख दुसऱ्यांसमोर गाऊ लागतात. आपले दु:ख त्रास दुसऱ्यांसमोर जगजाहीर करून स्वत:ला लाचर सिद्ध करू नका. यामुळे लोक तुमच्या परिस्थितीचा फायदा घेतात.
पुरुषाने एखाद्या मूर्ख व्यक्तीने केलेल्या अपमानाबद्दल दुसऱ्या व्यक्तीला सांगू नये. यामुळे तुमच्या मान-सन्मानाला ठेस पोहोचते. चाणक्य म्हणतात अशा प्रकारच्या घटना झाल्यास त्या विसरून जाणे हीच एकमेव समजदारीचे काम आहे. अन्यथा याचे परिणाम वाईट होऊ शकतात.