
मुंबई : बॉलीवूडच्या अनेक कलाकारांच्या मुलांनी इंडस्ट्री मध्ये पदार्पण केलं आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, आमिर खानचा मुलगा जुनैद खान, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवींची मुलगी खुशी कपूर अशा नामांकित कलाकारांच्या मुलांनी आजपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले आहे. कलाकारांप्रमाणे त्यांची मुलेही तितकीच चर्चेत असतात. अशातच आता रवीना टंडनच्या मुलीचं नेटकरी कौतुकच करत आहेत. तिची थेट तुलना सुहाना खान, खुशी कपूरसह कतरिना कैफबरोबर करत आहेत.

ठाणे: उबाठा गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत असे म्हणाले होते. आता जनताच ठरवेल खरी शिवसेना ...
रवीना टंडनची मुलगी राशा थडानी अवघ्या १९ वर्षांची आहे. तिच्या जबरदस्त डान्सने तिने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. ती ‘आजाद’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. याच चित्रपटातील तिचं पहिलं गाणं ‘उई अम्मा’ प्रदर्शित झालं आहे. या गाण्यावर राशाचा डान्स पाहून नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत. तिने आपल्या डान्ससह अदाकारीने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.
?si=eaDvTxzt0RvrlcG1
अभिनेत्री राशा थडानीचं ‘उई अम्मा’ गाणं ४ जानेवारीला प्रदर्शित झालं. मधुबंती बागने हे गाणं गायलं असून अमित त्रिवेदीने संगीतबद्ध केलं आहे. तर अमिताभ भट्टाचार्य हे या गाण्याचे गीतकार आहेत. या गाण्यातील जबरदस्त डान्समुळे राशावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.