मुंबई : मुंबईत दादर येथील एका विदेशी कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना लाखो रुपयांना चूना लावला (Fraud) असून कंपनीला टाळे लावून मालक फरार झाला आहे. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आता टाहो फोडला आहे.
बाजारात पैसे डबल करणा-या अनेक कंपन्या येतात आणि लोकांचे पैसे डुबवून जातात. अशीच एक रशियन कंपनी टोरेस (Torres) मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिर समोरील गल्लीत वर्षभरापूर्वीच आली होती. पाच हजार स्केअर फूटाचे आलिशान ऑफीस ब्लेझर घालून स्टाफ, येण्या-जाणा-याला बिसलरी पाणी, कॉफी, चहा मोफत. सुरवात त्यांनी महिना चार टक्के व्याजाने केली. पण गेल्या महिन्यात ती एकदम ११ टक्के महिना केली. लाखो लोकांनी पैसे गुंतवले. अगदी ५ हजारापासून लाखांपर्यंत.
पण शनिवारी रात्रीपासून याला टाळ लागलं आहे. सुरुवातीला कंपनीकडून काही हप्ते देण्यात आले पण गेल्या दोन आठवड्यांपासून कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नसल्याचं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. आणि आता या कंपनीबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली आहे.