मुंबई:भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५मध्ये बंगालच्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. आता मोहम्मद शमीने ५ जानेवारीला मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात ऑलराऊंडर कामगिरी केली.
शमीने आधी ३४ बॉलमध्ये नाबाद ४२ धावांची शानदार खेळी केली. यात त्याने ५ चौकार आणि एक षटकार ठोकला. त्यानंतर गोलंदाजी करत असताना ८ षटकांमध्ये ४० धावा देत एक विकेटही मिळवला.
शमीच्या ऑलराऊंड खेळाव्यतिरिक्त बंगालला या सामन्यात ६ विकेट्सनी पराभव सहन कराव लागला. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. सामन्यात बंगालने ५० षटकांत ६ बाद २६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या संघाने २० बॉल राखत लक्ष्य गाठले. डाव्या गुडघ्याला सूज असल्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५साठी शमीच्या नावावर विचार करण्यात आला नव्हता.
शमी आता हळू हळू आपल्या लयीमध्ये परतत आहे. जर शमी पूर्णपणे फिट झाला तर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५साठी संघात स्थान मिळू शकते. शमी वनडे वर्ल्डकप २०२३ नंतरपासून टीम इंडियाबाहेर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ हायब्रिड मॉडेलला १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. हे सामने पाकिस्तान आणि दुबईत रंगतील.