Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीInvestment: दररोज २०० रूपयांची बचत, तुमच्या मुलांना बनवणार करोडपती

Investment: दररोज २०० रूपयांची बचत, तुमच्या मुलांना बनवणार करोडपती

मुंबई: नव्या वर्षाची सुरूवात नव्या उमेदीने झाली आहे. २०२५मध्ये लोकांनी आपले आर्थिक आरोग्य तंदुरूस्त राखण्यासाठी अनेक गोल्स निर्धारिसत केले आहेत. यातच जर तुम्हाला तुमच्या मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचे असेल तर नव्या वर्षात त्यांना खास गिफ्ट द्या. यामुळे २४व्या वर्षी ते करोडपती बनू शकतील. म्युच्युअल फंडबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल. केवळ २०० रूपये प्रति दिवस अथवा ६ हजार रूपये प्रति महिना गुंतवणूक करून हे शक्य आहे.

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे एसआयपी. ही एक लाँग टर्म इन्वेस्टमेंट प्रोसेस आहे. यात कंपाऊंडिंग फायदेही मिळतात तसेच जमा केलेला फंड वाढतो. आजच्या काळात केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील लोकही यात इंटरेस्ट दाखवत आहेत.

दर महिना जमा करा ६ हजार रूपये

नव्या वर्षात कशी आणि किती रूपयांची सुरूवात करता येईल ज्यामुळे करोडपती बनता येईल. याचे कॅलक्युलेशन अगदी सोपे आहे. जर तुम्ही दररोज २०० रूपये अथवा महिन्याला ६ हजार रूपये वाचवून एसआयपी करत असाल तर तुम्ही हे लक्ष्य गाठू शकता. एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांना सामान्यपणे १५ ते १६ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. मात्र आपण साधारणपणे १२ टक्के व्याज पकडून चालू. तर ६००० रूपयांची एसआयपी २४ वर्षांसाठी केल्यास तुमचे १७,२८,००० रूपये जमा होतात. यावर कंपाऊंडिंगसोबतचे रिटर्न्स ८३,०८,१२३ रूपये होतील. या हिशेबाने एकूण मिळून जेव्हा तुमचे मूल २४ वर्षांचे होईल तेव्हा त्याच्याकडे १,००,३६,१२३ रूपयांचा फंड असेल. म्युच्युअल फंडमध्ये १२ टक्केच नव्हे तर कधी कधी १५ ते १६ टक्क्यांपर्यंत गुंतवणूकदारांना रिटर्न्स मिळतात.

सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीची लोकप्रिय पद्धत आहे. याच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. एसआयपीचा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या बँक अकाऊंटमधून निर्धारित रक्कम कापली जाऊन ती एसआयपीमध्ये गुंतवली जाते. गेल्या दोन ते तीन दशकात म्युच्युअल फंडने जबरदस्त रिटर्न दिले आहेत. मात्र यासाठी योग्य त्या फंडची निवड करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -