
तापामुळे आठ महिन्यांच्या मुलाला बाप्टिस्ट रुग्णालयात दाखल केले आहे. खासगी लॅबमध्ये नमुने तपासल्यानंतर मुलाला ह्युमन मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाल्याचे लक्षात आहे. सरकारी प्रयोगशाळेने नमुने तपासलेले नाहीत. रुग्णावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी राज्याचा आरोग्य विभाग आणखी माहिती घेत आहे.
बंगळुरूच्या बाप्टिस्ट रुग्णालयात तीन महिन्यांच्या चिमुरडीलाही दाखल केले आहे. या मुलीला आधीपासूनच ब्राँकोन्यूमोनयाचा त्रास होता. आता या चिमुरडीला ह्युमन मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाली आहे. या चिमुरडीचे नमुने पण अद्याप सरकारी लॅबने तपासलेले नाहीत. या प्रकरणातही राज्याचा आरोग्य विभाग आणखी माहिती घेत आहे.

चीनमध्ये नवे संसर्गजन्य आजार, पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता
बीजिंग : कोरोना संकटाची सुरुवात चीनमधून झाली. या आजारामुळे चीनसह जगातील अनेक देशांना लॉकडाऊन करावे लागले. यामुळे अर्थचक्र मंदावले. अनेकांचा मृत्यू ...
दोन्ही मुलांना ज्या विषाणूची बाधा झाली आहे तो चीनमध्ये आढळलेला ह्युमन मेटान्यूमोव्हायरसच आहे का याची माहिती अद्याप कर्नाटक सरकारने दिलेली नाही. ह्युमन मेटान्यूमोव्हायरसची कमी - जास्त प्रमाणात बाधा झाल्यामुळे इन्फ्लूएंझा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, कोविड-१९ असे वेगवेगळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका असतो.

HMPV विषाणू : आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त
आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त - मास्क वापरावा, सातत्याने हात धुण्याचा सल्ला बीजिंग : चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण ...
सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसला आळा घालण्यासाठी लस अस्तित्वात नाही. तसेच मानवी मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाल्यास बरे करण्यासाठी एकही ठोस औषध उपलब्ध नाही. रुग्णाला मानवी मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाली तर सुरुवातीला सर्दी - खोकला, ताप अशी सामान्य लक्षणे दिसतात आणि हळू हळू परिस्थिती बिघडते. पण या संकटावर मात करण्यासाठी उपाय सापडलेला नाही.