रिझर्व्ह बँकेच्या अर्थशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. या वर्षी देशात अर्थव्यवस्थेत तेजी येण्याची शक्यता आहे. यंदा रिझर्व्ह बँक स्वस्त कर्ज देण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरात कपात करण्याची शक्यता आहे. मात्र या मार्गात काही आव्हानेही आहेत ज्यांचा निपटारा करावा लागेल. जियो पॉलिटिकल टेन्शनच्या शिवाय भारताला देशांतर्गत महागाईचा दर आटोक्यात ठेवावा लागेल. त्याचबरोबर खासगी क्षेत्राला आपले खर्च वाढवावे लागतील. कारण भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याने सप्टेंबरच्या तिमाहीतील सुस्तीला मागे टाकून ती वेगाने उसळी घेईल अशी आशा आहे. २०२५ मध्ये देशाची अर्थव्यवस्था आणखी सकारात्मक तेजीची आशा बाळगून आहे.
उमेश कुलकर्णी
रिझर्व्ह बँकेच्या अर्थशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, सणासुदीच्या उपक्रमांमुळे आणि ग्रामीण भागातील मागणी वाढल्याने अर्थव्यवस्थेस सलग आणि जोरदार पाठिंबा मिळत आहे. देशाची आर्थिक वाढ जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत खालच्या स्तरावर म्हणजे ५.४ टक्क्यावर पोहोचली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यावेळी म्हटले होते की, हा एक तात्पुरता झटका आहे आणि यापुढील तिमाहीत यात वाढ झालेली दिसेल. वाढ विरुद्ध महागाई या चर्चेत रिझर्व्ह बँक आणि आरबीआय यांच्यात मतभेद निर्माण झाले असतानाच सर्वांच्या नजरा फेब्रुवारीत संभाव्य व्याज दर कपातीवर राहतील. एकीकडे अर्थव्यवस्थेत सुधारणा होणार असतानाच दुसरी एक चांगली बातमी आहे ती अर्थविश्वसाठी चांगली आहे. ती म्हणजे वाहन उद्योगाने यंदा विक्रमी विक्री नोंदवली आहे. कोविडच्या साथीत जो वाहनउद्योग रसातळाला गेला होता त्याने त्यातून चांगलीच उभारी घेतली आहे. आता तर त्याने विक्रमी घोडदौड केली आहे. गेल्या दोन वर्षांत दोन अंकी वाढ नोंदवणाऱ्या वाहन उद्योगाने २०२४ मध्ये वार्षिक विक्रीबाबतीत लहानसा ब्रेक लागला होता. आता मात्र वाहनांची विक्री वार्षिक स्तरावर ९ टक्क्यांनी वाढून ती २.६१ लाख झाली. २०२३ मध्ये ती २.४ लाख इतकी होती. हे एक वाहन उद्योगाने मिळवलेले महत्त्वपूर्ण यश आहे. कारण ही या उद्योगाने जागतिक महामारीनंतर २.५४ लाख वाहन विक्रीची बरोबरी केली. ६ वर्षांनंतर वाहन उद्योग आपल्या पूर्ण क्षमतेसह आता सर्व आव्हानांना तोंड देण्यास समर्थ झाला आहे. आपल्या सर्व आव्हानांवर मात करण्यास सक्षम झाला आहे. उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, वाहनांच्या विक्रीच्या संदर्भात पाहिले, तर २०२५ हे वर्ष तसे कमजोर राहील. दुचाकी वाहनांच्या विक्रीत ६ ते ८ टक्के तर ट्रॅक्टर विक्रीत ३ ते ५ टक्के वाढ झालेली दिसेल. व्यापारी वाहनाची विक्री मात्र बऱ्याच अंशी बुनियादी स्तरावर सरकारी खर्चावर अवलंबून राहील. या संदर्भात बोलताना टाटा मोटर्सचे प्रवासी वाहनांचे प्रमुख शैलेश चंद्रा यांनी सांगितले की वाहन उद्योगाला नव्या वर्षात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
वाहन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये एकूण २.४१ कोटी वाहनांची विक्री झाली होती. हा आकडा २०२० मध्ये १.८६ कोटी, २०२१ मध्ये १.८९ कोटी तर २०२२ मध्ये १.१५ कोटी इतका होता. क्रिसिलचे निर्देशक तथा वरिष्ठ नेते हेमल ठक्कर यांनी सांगितले की आम्ही कदाचित त्या निवडक अर्थव्यवस्थांमध्ये सहभागी आहोत ज्यात कोविड पूर्व आकडे केव्हाच पार केले आहेत आणि आता आम्ही अशा एका आव्हानात्मक स्थितीत आहोत की जेथून आम्हाला पुढची झेप घ्यायची आहे. आम्ही अशी आशा करतो की वित्त वर्षे २०२६ मध्ये सकल जीडीपीचा दर ६.५ वार्षिकच्या वर राहील तसेच सामान्य पाऊस आणि मान्सून यंदाचा नेहमीप्रमाणे राहिल्यानेही सर्व वर्गातील वाहन विक्रीत चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळेल. २०२४ मध्ये विद्युत वाहनांची विक्री १९.५ लाख वाहनांच्या सार्वकालिक उच्च स्तराला स्पर्श करून गेली. याच दरम्यान इव्हीची विक्रीने ७.५ टक्के झेप घेतली होती. जी २०२३ मध्ये ६.३९ टक्के इतकी होती. संपूर्ण वर्षात विकल्या गेलेल्या वाहनांमध्ये पेट्रोल वाहनांचा भाग ७४ टक्के इतका होता, तर डिझेल वाहनांचा वाटा १० टक्के राहिला. चंद्रा यानी सांगितले की आम्हाला आशा आहे की २०२५ मध्ये भारतीय प्रवासी वाहनांच्या बाजारात वृद्धीचा वेग चांगला राहील. टाटा मोटर्स वाहन उद्योगात होणाऱ्या बदलांचा लाभ उठलवण्यासाठी सध्या मजबूत स्थितीत आहे. चंद्रा यांच्या म्हणण्यानुसार,
आपल्या वेगाला कायम ठेवण्यासाठी बाजारातील हिस्सेदारी वाढवण्यासाठी आणि ईव्ही श्रेणीत ते त्यांची अग्रणी स्थिती मजबूत ठेवण्यासाठी हरसंभव प्रयत्न करतील.
प्रवासी वाहनांच्या बाजारातील सर्वात मोठी चिंता ही न विकल्या गेलेल्या वाहनांच्या वाढत्या साठ्याची आहे. डिसेंबर २०२४ मध्ये न विकल्या गेलेल्या वाहनांचा साठा सहा लाख पन्नास हजार इतका झाला होता. सणांच्या दिवसात विक्रेत्यांना आपल्याकडील हा साठा काही प्रमाणात विकण्यास मदत मिळाली. वाहन विक्रेत्यांची संघाचे फाडाचे अध्यक्ष सी एस विग्नेश्वर यांनी सांगितले की आमच्यासाठी २०२४ वर्ष चांगले गेले. सणांच्या दिवसात विक्रीही चांगली झाली. २०२५ मध्येही आम्ही चांगल्या विक्रीची अपेक्षा करतो आहोत. या एकामागोमाग दोन चांगल्या बातम्या आल्यानंतर अर्थविश्वात चांगले वातावरण आहे. कर्जही स्वस्त होणार आहे तर वाहन उद्योगांची विक्री वाढली आहे. त्यामुळे एकूणच अर्थविश्व आणि एकूण समृद्धी जोरदार दिसत आहे. त्याचा परिणाम आम आदमीच्या जीवनमानावर होणार असून पंतप्रधान मोदी यानी जे अच्छे दिन दाखवले त्याची फले दिसत आहेत. शेअर बाजारातही चांगले वातावरण दिसत आहे आणि अनेक शेअर्सचे भाव वधारले आहेत. नव वर्षाची ही भेट ग्राहकांना चांगलीच मानवलेली दिसत आहे.