मेरठ : अविवाहित जोडप्यांसाठी (Unmarried couples) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत अविवाहित जोडप्यांना ओयो (OYO Room Booking) रुम बुकींग प्रकिया सुखरुपरित्या होत होती. मात्र आता काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ऑनलाइन हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म OYOने नवी पॉलिसी सुरु केली आहे. त्यामुळे आता अविवाहित जोडप्यांना OYOमध्ये चेक-इन करण्याची (OYO Check-In Policy) परवानगी दिली जाणार नाही.
Swami Samarth Solapur : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १५ दिवसांत १५ लाख भाविकांना महाप्रसाद
मिळालेल्या माहितीनुसार, सोबतच OYO ने अन्य सुधारणात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. समाजात कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी OYOच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. सध्या ही पॉलिसी मेरठमध्ये लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, मेरठमध्ये ही पॉलिसी यशस्वी झाली तर इतर शहरांमध्येही हे बदल लागू केले जातील.
चेक-इन करताना कोणती कागदपत्रं आवश्यक?
नव्या पॉलिसीअंतर्गत आता सर्व जोडप्यांना चेक-इन करताना वैध ओळखपत्र आणि लग्नाचा पुरावा देणारी कागदपत्र दाखवावी लागणार आहेत. ही बुकिंग ऑनलाइन असली किंवा सरळ हॉटेलमध्ये जाऊन करावयाची असेल तरीही जोडप्यांना ही कागदपत्रं द्यावी लागतील. तसेच पुरेशी कागदपत्र नसल्यास अशा जोडप्यांचं बुकिंग रद्द केलं जाऊ शकतं.