मुंबई: ऑस्ट्रेलियाने भारताला कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात ६ विकेटनी हरवले. त्यांनी सिडनी कसोटीसह मालिकेवर ३-१ असा कब्जा केला. ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफी देण्यात आली. मात्र ही मालिका जिंकल्यानंतर पैसेही मिळतात का?
खरंतर बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून केवळ ट्रॉफीच दिली जाते. यासाठी कोणतीही रक्कम ठरवण्यात आलेली नाही. मात्र एक वेगळाच अँगल आहे. जर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अथवा क्रिकेट ऑस्ट्रेलिया हवे असल्यास आपल्या खेळाडूंना बक्षीस म्हणून काही रक्कम देऊ शकते.
टीम इंडियाचा या मालिकेत पराभव झाला. दरम्यान, त्यांना काहीच मिळणार नाही. मात्र गेल्यावेळेस संघाला जिंकल्यानंतर पैसे मिळाले होते. मिडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाला ५ कोटी रूपये मिळाले होते.
मात्र यावेळेस ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सध्या यासाठीच्या बक्षिसाच्या रकमेची घोषणा करण्यात आलेली नाही. भारताने मालिकेतील पहिला सामना २९५ धावांनी जिंकला होता. मात्र त्यानंतरच्या तीन सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली. तर एक सामना अनिर्णीत ठरला होता.