Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीNarhari Zirwal : पदभार घेताच अन्न व औषध प्रशासन मंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये!

Narhari Zirwal : पदभार घेताच अन्न व औषध प्रशासन मंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये!

दिंडोरी : सलग चार वेळा दिंडोरी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी अन्न व औषध प्रशासन खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

OYO Check-In Policy : अविवाहित जोडप्यांना आता OYOमध्ये नो एन्ट्री! सुरु केली ‘ही’ नवी पॉलिसी

मुंबई येथील बीकेसी आयुक्त कार्यालयात झिरवण यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभागाच्या बैठकीत सचिव वाघमारे,आयुक्त नार्वेकर, विभागाचे सर्व सहकारी व उच्च पदस्थ अधिकारी तसेच खाजागी सचिव भोगे व युवा नेते गोकुळ झिरवाळ यावेळी उपस्थित होते. विभागातील कार्यालयात अपुर्या मनुष्य बळाअभावी येणाऱ्या अडचणी, तसेच नवीन जिल्हा अद्यावत कार्यालय इमारतीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी दर्जेदार पद्धतीचे सकस अन्न व औषध उपलब्ध करुन देण्याविषयीबाबतच्या संभाव्य अडचणी व त्यावर उपाययोजनास अग्रक्रमाने प्राधान्य विषयावार देण्यात आले. तसेच आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा,वसतीगृह येथील अन्न व खाद्य पदार्थ दर्जेदार उपलब्ध होण्याच्या कामी नियोजन आखणी, पोषण आहारासंदर्भात राज्यातील काही भागात निर्माण झालेल्या अडचणीमुळे आरोग्याचा प्रश्न उभा राहीला होता, त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेऊन पारदर्शक कार्यप्रणाली राबविण्याचे आदेश नरहरी झिरवाळ यांनी दिले.

महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्हे यामधील अन्न व औषध प्रशासन विभागाला येणाऱ्या अडचणी व समस्या यांचे तातडीने निराकारण करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे आदेश मुख्य सचिव व अधिकारी यांच्या बैठकीत दिले. पदभार स्वीकारताच नामदार झिरवाळ यांनी कामाचा धडाका लावून अॕक्शन मोडमध्ये आल्याचे दाखवून दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -