Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Pune News : शहरातील प्रमुख १५ रस्ते कोंडीमुक्त करण्यावर भर; गतिमान वाहतुकीचा संकल्प!

Pune News : शहरातील प्रमुख १५ रस्ते कोंडीमुक्त करण्यावर भर; गतिमान वाहतुकीचा संकल्प!

पुणे : वाहतूक पोलीस आणि महापालिकेने संयुक्तपणे केलेल्या उपाययोजनांमुळे सोलापूर रस्त्यावरील कोंडी कमी झाली असून, वाहतुकीचा वेग वाढला आहे. सोलापूर रस्त्याप्रमाणे शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवरील वाहतूक लवकरच गतिमान होणार आहे. (Pune News)



‘सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी, तसेच वेग याबाबत पोलीस आणि महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. स्वारगेटपासून हडपसरपर्यंत वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी रामटेकडी पूल, रविदर्शन, तसेच फातिमानगर चौकात वाहतूकविषय सुधारणा करण्यात आल्या. या कामांमुळे वाहतुकीचा वेग वाढला असून, कोंडीही दूर झाली आहे,’ अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (पथ विभाग) अनिरुद्ध पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मेटा आर्क कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद रोडे, वाहतूक नियोजक निखिल निहार, तसेच वाहतूक शाखेतील अधिकारी या वेळी उपस्थित होते.


सोलापूर रस्त्याच्या धर्तीवर येत्या काही दिवसांत शहरातील प्रमुख रस्त्यांवर उपाययोजना केल्या जाणार आहेत. नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा, पाषाण, बाणेर, संगमवाडी, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता या रस्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या रस्त्यांवरील वाहतूकविषयक कामे केल्यानंतर कोंडीची समस्या कमी होऊन वाहतूक अधिक गतिमान होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुधारणा नेमक्या काय?




  • चौकांतील कोंडी दूर करणे

  • पदपथावरील अतिक्रमण हटविणे

  • दुभाजकांत सुधारणा

  • वाहने लावण्यासाठी जागा

Comments
Add Comment