
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ दोन युवक निष्काळजी व भरधाव वेगाने हुल्लडबाजी (कार रेसिंग) करत वाहने चालविताना आढळून आले आहे. यामधील वाहन क्रमांक एम. एच १२ एफ वाय ७२६३ या वाहनाचा सागरी किनारा रस्त्याच्या भिंतीला धडकून अपघात झाला. या वाहन चालकावर मलबार हिल पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र मोटार वाहन विभागाकडून एम एच १२ एफ वाय ७२६३ व एम एच ०३ एडब्ल्यू २२५५ ही वाहने दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांना मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, दोन्ही वाहन चालकांचे परवाना तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात आला आहे. राज्यामध्ये १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने सन-२०२५ या वर्षात रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त विविध विभागांमार्फत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विशेषत: मुंबई महानगरातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा ...