Monday, May 12, 2025

देशमहत्वाची बातमी

गुजरातमध्ये तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात ३ जण ठार 

गुजरातमध्ये तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात ३ जण ठार 

अहमदाबाद : गुजरातमधील पोरबंदर विमानतळावर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.तर काही जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये दोन वैमानिकांसह तीन क्रू मेंबर्सचा समावेश आहे. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजता घडली असल्याची माहिती पोरबंदरचे पोलीस अधीक्षक भगीरथसिंह जडेजा यांनी सांगितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोस्ट गार्डचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर गुजरातमधील पोरबंदर येथे रविवारी नियमित प्रशिक्षण उड्डाण दरम्यान क्रॅश झाले. रविवारी दुपारी 12 वाजता कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. हेलिकॉप्टर नेहमीच्या उड्डाणावर होते आणि हेलिकॉप्टर उतरत असताना हा अपघात झाला. लँडिंग दरम्यान काही तांत्रिक बिघाड झाला.जमिनीवर आदळताच हेलिकॉप्टरला आग लागली आणि धुराचे ढग बाहेर येऊ लागले. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह एकूण तीन जण होते. या अपघातात तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टर टेक ऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता, त्यानंतर हेलिकॉप्टर क्रॅश झालं. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.तसेच हा अपघात का झाला, या मागच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच तटरक्षक दलाचं एक विमान समुद्रामध्ये दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या अपघातानंतर काही महिन्यातच पश्चिम किनारपट्टीवर ही दुर्घटना घडली आहे.

Comments
Add Comment