
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवीन महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड शरणागतीनंतर संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी फरार असलेल्या ३ आरोपींपैकी दोघांना २५ दिवसांनी अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तिसऱ्या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत. CID पथक आणि SIT द्वारे करण्यात येत असलेल्या संयुक्त तपासाद्वारे दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

माजी महापौर नंदकुमार घोडीले यांचा शिवसेनेत प्रवेश मुंबई : छत्रपती संभाजीनगरचे उबाठा गटाचे माजी महापौर नंदकुमारजी घोडीले आणि त्यांच्या पत्नी माजी ...
संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सुरुवातीला विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. तर आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले , कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे हे फरार होते. या आरोपींना पकडण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करत फरार घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. दोन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. सुदर्शन घुलेच या हत्येमागचा मुख्य आरोपी आहे असं म्हटलं जात आहे.