Friday, January 17, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्ससंतोष ‘रुखवत’ घेऊन आलाय...

संतोष ‘रुखवत’ घेऊन आलाय…

टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल 

संतोष जुवेकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजनाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. ‘रुखवत’ हा त्याचा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संतोषचे शालेय शिक्षण कळव्याच्या सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत झाले. शाळेतील स्नेहसंमेलनात त्याने भाग घेतला होता. नृत्यात त्याने भाग घेतला होता. शाळेच्या कथाकथनाच्या उपक्रमात देखील त्याने भाग घेतला होता. ठाण्याच्या कॉलेजमध्ये शिकत असताना आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत त्याने भाग घेतला होता. कुमार कला केंद्र, सवाई एकांकिका स्पर्धेत त्याने भाग घेतला.

‘आणि मकरंद राजाध्यक्ष’ या नाटकापासून त्याची अभिनयाची सुरुवात झाली. या गोजिरवाण्या घरात या मालिकेपासून त्याच्या मालिकेतील अभिनयाच्या प्रवासास सुरुवात झाली. ‘वादळवाट’, ‘जिवलगा’, ‘व्वा क्या बात है’, ‘असं सासरं सुरेख बाई’ या मालिकेमध्ये त्याने काम केले. ‘ब्लाइंड गेम’ या चित्रपटापासून त्याची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.

‘मोरया’,‘झेंडा’,‘रींगा रिंगा ’,‘फक्त लढ म्हणा’ हे त्याचे चित्रपट गाजले. ‘झेंडा’ चित्रपट हा त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला. ‘झेंडा’ चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना खूप भावले. संतोषची कार्यकर्त्याची भूमिका प्रेक्षकांनी उचलून धरली. चांगल्या भरपूर प्रतिक्रिया त्याला मिळाल्या. हल्लीच संतोषचा रिलीज झालेला ‘रानटी’ चित्रपट देखील काही प्रेक्षकांना आवडला. त्यातील त्याच्या भूमिकेचे कौतुक केले गेले.

‘रुखवत’ हा संतोष जुवेकरचा नवीन चित्रपट आलेला आहे. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया एन्टरटेन्मेंट ग्रुपद्वारे प्रस्तुत व राबरी एन्टरटेन्मेंटद्वारे निर्मित ‘रुखवत’ हा चित्रपट आलेला आहे. रुखवत ही महाराष्ट्रातील अत्यंत जुनी आणि लोकप्रिय परंपरा आहे. या चित्रपटाविषयी विचारले असता संतोष म्हणाला की या चित्रपटाचे कथानक पुनर्जन्मावर आधारित आहे. दोन व्यक्तिरेखेचा पुनर्जन्म व त्यानंतरचा प्रवास पाहायला मिळणार आहे. एक चांगली प्रेमकथा प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

प्रियदर्शनी इंदलकर एक चांगली अभिनेत्री आहे. ती जशी दिसायला सुंदर आहे तसे तिने काम देखील छान केले आहे. तिच्या बरोबर काम करताना मजा आली. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम प्रधान यांनी एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आणलेला आहे. रुखवत ही आपली महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या चित्रपटात तीन गाणी आहेत. ऋतूंच्या बदलत्या छटाची सुंदर अनुभूती देणार ‘ऋतु प्रेमवेडा’ गे गाणं व लग्न समारंभाची पारंपरिक रोषणाई देणार ‘लगीन सराई’ हे गाणं प्रेक्षकांनी चित्रपट रिलीज होण्याअगोदर पाहिलेलं आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबई व नाशिकमध्ये झालं आहे.
या चित्रपटाची सुरुवात पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांच्या ग्रुपची आहे, जे शैक्षणिक सहलीसाठी एका प्राचीन व जुन्या विशाल वाड्यात जातात. वाड्यात फिरत असताना संतोष जुवेकरला व प्रियदर्शनी इंदलकरला त्या ठिकाणी जुने रुखवत दिसते, जवळ जाऊन पाहताच त्यांना त्यातील बाहुल्यामधून बांगड्यांचे, हसण्याचे आणि इतर गूढ आवाज ऐकू येतात. त्या वाड्याचा इतिहास काय आहे? त्यात मांडलेल्या रुखवतचे रहस्य काय? बाहुला बाहुलीचे आवाज ऐकू येण्यामागचे नक्की कारण काय? वाड्यात फिरताना येणारे ऐकू येणारे आवाज व होणारे भास यामागच कारण काय? या सगळ्यांचा उलगडा दोघे मिळून कसे करतात याची जुगलबंदी या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रुखवत या चित्रपटामध्ये सांस्कृतिक धारा व थ्रिलर कथानक याचे सुंदर मिश्रण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तरुण पिढीला व संपूर्ण कुटुंबाला हा चित्रपट आवडेल असा आशावाद त्याने व्यक्त केला.

महाराष्ट्रात तरी मराठी सिनेमा पहिल्या क्रमांकावर असावा. मराठी प्रेक्षकांनी आपले कर्तव्य म्हणून मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहावे असे मत संतोषने व्यक्त केले. मराठीमध्ये अष्ठपदी व हिंदीमध्ये ‘छावा’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. संतोषला रुखवत चित्रपटासाठी व येणाऱ्या नवीन वर्षातील चित्रपटाच्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -