सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यातील सिडनीच्या पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांवर संपुष्टात आला आहे. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांच्या प्रत्येकी ३ बळींच्या जोरावर भारताला ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांवर रोखता आला. भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराहने २ विकेट घेतल्या तर नितीश कुमार रेड्डीने २ विकेट घेतल्या.
याआधी भारताचा पहिला डाव १८५ धावांवर संपुष्टात आला होता. ऑस्ट्रेलियाकडून ब्यू वेबस्टरने सर्वाधिक ५७ धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथला ३३ धावा करता आल्या. सलामीवीर सॅन कॉन्स्टासने २३ धावा केल्या.
Rohit Sharma: रोहित शर्माने निवृत्तीबाबत मौन सोडले, म्हणाला- मी कुठेही…
भारताच्या पहिल्या डावात सर्वाधिक४० धावा ऋषभ पंतने केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ४ विकेट स्कॉट बोलँडने घेतल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह या सामन्यात नेतृत्वत करत आहे. तर रोहित शर्माने या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला.
पर्थमध्ये भारताने पहिला कसोटी सामना २९५ धावांनी जिंकला होता. त्यानंतर अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाने १० विकेटनी सामना जिंकला. यानंतर ब्रिस्बेन कसोटी अनिर्णीत राहिली. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी जबरदस्त विजय मिळवला.