Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीTMKOC : गोकुळधामची गरबा क्विन परतणार! पोपटलाल करणार AI द्वारे तयार केलेल्या...

TMKOC : गोकुळधामची गरबा क्विन परतणार! पोपटलाल करणार AI द्वारे तयार केलेल्या भविष्यवाणीचा उघड

मुंबई : तारक मेहता का उलटा चष्मा (TMKOC) या मालिकेत सातत्याने नवनवीन रंजक गोष्टी घडत असतात. अशातच मागील वर्षापासून गोकूलधामची गरबा क्विन म्हणजेच दयाबेन शो सोडून गेल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे गोकुळधामची गरबा क्विन कधी परतणार असा प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडला असताना पोपटलाल AIने तयार केलेला भविष्यवाणीचा खुलासा केला आहे. त्यामुळे गोकुळधामला धक्का बसला आहे. (Entertainment News)

Sachin Pilgaonkar : नव्या वर्षात नवी इनिंग! सचिन पिळगांवकर प्रस्तुत करत आहेत ‘स्थळ’

पोपटलालने AI द्वारे तयार केलेल्या भविष्यवाण्या उघड करण्यासाठी अचानक बैठक बोलावली आहे. यावेळी भविष्यवाणीद्वारे गोकुळधाम सोसायटीत नवीन सदस्य लवकरच सोसायटीत येणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर गोकुळधामची गरबा क्विन परत येणार असल्यााची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व सदस्य आनंद झाला आहे. मात्र पोपटलालने आनंदासोबत वाईट बातमीचाही इशारा दिला आहे.

बावरीचं लग्न तिच्या जिवाच्या आकांताने होण्याची शक्यता. श्रीमती सोधी स्वतःचा व्यवसाय सुरू करणार, पिंकूला त्याच्या स्वप्नातील नोकरी मिळणार, असल्याचे भविष्यवाणीत सांगितले आहे. मात्र तसेच भिडे त्याचे आदरणीय स्थान गमावणार असून चंपकचाचाजी देखील वर जाणार असा खुलासा केला आहे. त्यामुळे सोसायटीत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या सर्व गोष्टी खरंच ठरणार का? नव्या वर्षात दयाबेन पुन्हा येणार का हे पाहणं रंजक असणार आहे. (TMKOC)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -