Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीकोणत्याही बँकेतून काढता येईल ईपीएफओ पेन्शन

कोणत्याही बँकेतून काढता येईल ईपीएफओ पेन्शन

देशभरातील कार्यालयांमध्ये सुरू केली सीपीपीएस

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) देशभरातील सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टिम (सीपीपीएस) सुरू केली आहे. यामुळे पेन्शनधारकांना देशातील कुठल्याही बँकेतून निवृत्तीवेतन काढता येईल. तसेच पेन्शन सुरू झाल्यावर पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही आणि रक्कम लगेच खात्यात जमा होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. मांडवीय यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.

देशभरातील ६८ लाखांहून अधिक पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. यापूर्वी प्रत्येक प्रादेशिक कार्यालयाचे केवळ ३ ते ४ बँकांशी स्वतंत्र करार होते. सीपीपीएस अंतर्गत पेन्शनधारकाने स्थान, बँकेची शाखा बदलली तरीही पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित करावी लागणार नाही. यामुळे निवृत्तीनंतर आपल्या गावी जाणाऱ्या पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय पेन्शन योनजेद्वारे ईपीएफओच्या सेवांना अत्याधुनिक बनवण्याच्या आणि आमच्या पेन्शनधारकांसाठी सेवा अधिक पारदर्शक करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते असे मांडवीय यांनी सांगितले. सीपीपीएसचा पहिला पायलट प्रोजेक्ट ऑक्टोबर २०२४ मध्ये जम्मू, करनाल, श्रीनगर प्रादेशिक कार्यालयात यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. यानुसार ११  कोटी रुपयांची पेन्शन ४९ हजार पेन्शनर्सना वाटण्यात आली. दुसरा पायलट प्रोजेक्ट देशातील २४ कार्यालयात यशस्वीपणे राबवण्यात आला. तसेच २४ प्रादेशिक कार्यालयातून ९.३ लाख पेन्शनर्सना २१३ कोटी रुपयांचं वाटप करण्यात आले. यानुसार फिजिकल वेरिफिकेशन प्रक्रियेची आवश्यकता संपेल. पेन्शन वितरण सोप्या पद्धतीने होईल. नव्या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसह पेन्शन सर्विस डिस्ट्रीब्युशनमध्ये एक नवा इतिहास रचल्याचे मांडवीय यांनी सांगितले.

यासोबतच केंद्र सरकार लवकरच ईपीएफओ ३.०लागू करणार आहे. येत्या काही दिवसात पीएफ खात्यातील रक्कम खातेदारांना लवकर आणि सोप्या पद्धतीनं मिळावी यासाठी अनेक बदल करण्यात येणार आहेत. ईपीएफओ खात्यातील रक्कम काढण्यासंदर्भातील प्रक्रिया सोपी केली जाईल. देशातील कोट्यवधी पीएफ खातेधारकांना एटीएम कार्ड सारखे स्मार्ट कार्ड दिले जाईल. त्याद्वारे ते खातेदार एटीएम सेंटरमध्ये जाऊन पीएफ खात्यातील रक्कम काढू शकतात. मात्र, ही रक्कम पीएफ खात्यातील एकूण रकमेच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -