Saturday, October 18, 2025
Happy Diwali

ब्रम्ह मुहूर्तावर करा या मंत्राचा जप, लक्ष्मी माता होईल प्रसन्न

ब्रम्ह मुहूर्तावर करा या मंत्राचा जप, लक्ष्मी माता होईल प्रसन्न
मुंबई: हिंदू धर्मात ब्रम्ह मुहूर्ताची वेळ अतिशय शुभ मानली जाते. ब्रम्ह मुहूर्ताचा अर्थ देवाची वेळ. ब्रम्ह मुहूर्ताला अक्षय़ मुहूर्त असेही म्हटले जाते. आपल्या शास्त्रानुसार ब्रम्ह मुहूर्तामध्ये उठताच देवी-देवता तसेच आपल्या इष्ट देवतांची आठवण काढली पाहिजे. ज्योतिषांच्या मते ब्रम्हमुहूर्तावर उठल्यावर आपल्या हाताकडे पाहून काही मंत्रांचा उच्चार केला पाहिजे. हे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. जाणून घेऊया ब्रम्ह मुहूर्तावर उठल्यावर कोणत्या मंत्राचा उच्चार केला पाहिजे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तु गोविंदा, प्रभाते करदर्शनम आपले हात समोर धरून या मंत्राचा जप केला पाहिजे.

गायत्री मंत्र

ओम भूर्भुव: स्व: तस्तवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमही धियो यो न: प्रचोदयात हा मंत्र म्हटल्याने बुद्धी आणि ज्ञानाचे मार्ग प्रशस्त होतात तसेच लाभही होतात.

महामृत्यूंजय मंत्र

ओम त्र्यम्बकं यजामहे सुगंधिन पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योमर्मुक्षीय मामृतात या मंत्राच्या उच्चाराने आयुष्यातील सर्व व्याधींचा नाश होतो. ओम महालक्ष्मी नम: या मंत्राच्या उच्चाराने लक्ष्मी मातेची कृपा राहते. खर्च पूर्ण होतात तसेच थांबलेली संपत्तीही मिळते.  
Comments
Add Comment